पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. भाग सत्रावा. आयर्लंडमधील सहकारी प्रयत्न. ग्लास्गोहून आम्ही बोटीतून बेल्फ़ास्टला गेलो. 'एरिन्'चे मरकतमणितुल्य बेट में आयर्लंड त्याचे मला तेथें प्रथमच दर्शन झाले. त्या बेटांतील झगडे, उत्क्रांति, उमेदी व मनोरथ, हे सर्व दोन्ही राजकीय पक्षांमध्ये, वादविवादाचे व भांडणाचे विषय होऊन राहिले आहेत. युरोपांतील किंवा विलायतेंतील इतर मोठ्याशा शहराच्या मानाने बेल्फ़ास्ट मोठेसें आहे असे नाही. तरी ते फारच गजबजलेलें, उद्योगी, सर्व साधनांनी परिपूर्ण व बरेंच महत्त्वाचे स्थळ आहे. तेथील लोकांच्या अंगी प्रशंसनीय असें सार्वजनिक कार्यकर्तृत्व वसत आहे. पूर्वी मुंबई इलाख्यांतील पब्लिक वर्क्स खात्यांत असलेले मिस्टर जान टेट, या सन्मान्य मित्राच्या नेतृत्वाखाली, आह्मी तेथे आमच्या सफरीतील एक मजेदार व आनंदाचा दिवस घालविला. तेथील 'सिटी हॉल' फारच सुरेख आहे. त्यांतील संगमरवराचा भव्य जिना व मेजवानीचा प्रशस्त दिवाणखाना हे पाहून, २२२ माझ्या मनाची खात्री झाली की, विलायतेंतील या एका सामान्य शहरामध्ये, सार्वजनिक कामाकाजायोग्य स्थानाच्या बाबतीत जशी सोय केलेली आहे, तशी हिंदुस्थानांत, एका इलाख्यांतही केलेली नाही. तेथील सारी व्यवस्था व सामानसुमान, अगदी आतापर्यंतच्या नवीन सुधारणा व क्लुप्ती, यांना अनुसरून आहेत. मेजवानीच्या दिवाणखान्यामध्ये नाचाला सोईवार अशी पेटंट कमानीदार फरशी केलेली आहे. ही या सुधारणांचाच एक मासला आहे. तिच्यावर हवा तितका झोंक येण्याला, नाचणारी 'पांचशे जोडपी लागतात, असे म्हणतात. इतकी ही नाचणारी मंडळी, या लोकप्रिय करमणुकीचा अनुभव घेत, आनंदाने नाचण्यामध्ये निमग्न असल्यावेळचा देखावा, मनाला किती आनंददायक व उल्हासकारक होत असेल, याची सहज कल्पना करतां येईल. बेलफास्ट येथें गलबतें तयार करण्याचे प्रचंड कारखाने आहेत. त्यांच्यांत हवीं तेवढी मोठी गलबतें बनतात. तेथे पुष्कळच कारागीर व मजूर, यांचा रोजगार चालतो. तेथील "ड्राय डाक्स्’-पाणी काढून रिकामी करता येण्याजोगी गोदी‘फारच विस्तीर्ण आहे. तिच्यांत जपान सरकारासाठी तयार केलेली एक 'क्रुझर' साफ व दुरुस्त करीत होते. ती आमी पाहिली. येथे तागाचे कापड विणण्याचे कारखाने आहेत. त्यांच्यांत कच्च्या तागापासून, यांत्रिक मागांनी, कपडा विणतात. २२३