पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्लास्गो व हायलंडस्. स्वावलंबी असतात. तसाच या ' स्कॉट ' लोकांचा स्वभाव आहे. ते बाह्यतः कडक व कठोर वाटतात. तो त्यांचा गुण केवळ वरपांगी आहे. त्याच्या आड प्रेमळ व सहानुभूतियुक्त खरा स्वभाव झांकलेला असतो. कारण, निसर्गदेवतेच्या थोर अंतःकरणाचा त्यांना निकट सहवास घडलेला. त्यामुळे त्यांच्यामध्ये जीवात्म्याचे मृदु, तसेच कठोर, व खडबडीत गुणही विकास पावतात.