पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. असलेला पाहून, आमची नाउसेदशी झाली. पण कड्यावरून खाली पडल्यावर त्याचे पाणी फारच जोराने व खळाळीनें वहात होते. ओबन्ला परत आल्यावर आमीं कांही स्मारक वस्तू व स्कॉटिश् कापड खरेदी केले. आमच्या सफरींतील अगदी उत्तरेकडील ठिकाण ओबन् हेच होते. दिवस उन्हाळ्याचे असल्याने, आमाला सर्वांत मोठा दिवस या ठिकाणीच प्रथमतः: पाहण्यास मिळाला. रात्रीचे दहा वाजेपर्यंत सुद्धां, रस्त्यांत कृत्रिम प्रकाशाशिवाय, स्पष्ट दिसत होते. सकाळी निजून उठण्यापूर्वीच, सूर्य किती तरी वर आलेला असे. स्कॉटलंड देश 'शिव्हलरी अँड रोमान्स ' शूरवीर व स्त्रीजातीविषयी प्रेमळ व आदरभाव ठेवणाऱ्या लोकांच्या अद्भुत व अलौकिक गोष्टी-संबंधाने सुप्रसिद्ध आहे. तेथील : भूमीचा तुकडान् तुकडा, मनाला उत्साह आणणाऱ्या, उल्हास देणाऱ्या, व खडबडावून सोडणाऱ्या, काहींना काही स्थानिक . गोष्टींमुळे संस्मरणीय झालेला आहे. या गोष्टी व कहाण्या . शाहीर व पोवाडे रचून गाणारे लोकांनी जपून ठेविल्या आहेत. तेथील पर्वत, दऱ्याखोरी, सरोवरें, भयाण पण रमणीय वनप्रदेश व माळ, यांचे गुणगान अपरिमित प्रकारांनी साऱ्या भूमंडळावर होत आले आहे. खडबडीत टेकडयांनी व्याप्त व चित्रासारख्या सुंदर, अशा प्रदेशांत वास करणारे लोक, निसर्गतःच विचारी, मोकळ्या मनाचे, जपून वागणारे, धीट, व . २२०