पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्लास्गो व हायलडस्. स्थानांत, सृष्टिदेवतेचे प्रचंड वैभव प्रत्यही पाहण्याचा अम्यास आहे. त्या आझांला सुद्धां हा देखावा पाहून आनंद व आश्चर्य वाटल्यावांचून राहिले नाही. आमच्या ओबन्ला जाण्याच्या जलमार्गामध्ये समुद्रांतील 'लाक्स्'–वर खाली बोटी चढण्या उत-रण्याचे कृत्रिम बंद हौद-होते.त्यांच्या मधील मार्गाचे भागही फार मनोहर होते.त्याच्या दोन्ही बाजूंच्या टेकड्यांच्या उतारावर गर्द हिरवळ होती. यामुळे त्या टेकड्या फार प्रेक्षणीय झाल्या होत्या. ओबन् येथे आम्ही दोन दिवस स्वस्थ व आरामांत घालविले. हा गांव फारच रमणीय स्थळी वसलेला आहे. त्याच्या पुढे, खाली समुद्राची खाडी, मागच्या अंगाला पहाडांची रांग, व उत्तम पोशाख केलेले,शांत स्वभावाच्या व मजेनें हवा खात फिरणाऱ्या लोकांचे थवेच्या थवे, या सर्वांचा माझ्या मनावर फारच चांगला परिणाम झाला. अशीच दूसरी पुष्कळशी स्थळे जवळपास आहेत.त्यांतील इन्स्टॉफ्नेज् क्यासल आम्ही पाहून आलो. इ. स. १७१५ व इ. स. १७४५ सालच्या बंडांच्या वेळी तेथे शिबंदी रहात होती.पण इ.स.१८१० -साली आग लागून किल्लयांतील बराचसा भाग जळाला.तेव्हांपासून तेथे कोणी राहात नाही. तसेंच येथून काही मैलांवर लोराचा धबधबा आहे. तो पाहण्यासही आम्ही गेलो होतो. त्याच्या आवाजावरून, तो पुष्कळच उंचावरून पडत असावा, असें वाटले होते. पण तो सारा पांच सहा फुटांवरूनच पडत २१९