पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. की, तेथील एका जमिनीच्या कौलनाम्यामध्ये त्याविषयींची एक शर्थ घातलेली आहे. ती जमीन ग्लेन नेव्हिस्मधील क्यामेरॉन् यांच्याकडे आहे.तिच्यासंबंधी कौलनाम्यांत बेन् नेव्हिस्च्या शिख-रावर बर्फ कायम असेल,तोवर ती जमीन त्यांच्याकडे कायम राहील, असें कलम आहे. या कबजाला एकदांच काय तो काहींसा धोका आला होता, असे समजते. त्यावेळी क्यामेरॉन् यांना त्या शिखरावर तंबू ठोकून त्या बर्फाचा बचाव करण्याची पाळी आली होती. त्या वर्षी हिवाळा सौम्य गेला होता, आणि पुढचे वसंत व ग्रीष्म ऋतू, कडक झाले. त्यामुळे बर्फ भराभर वितळू -लागले. इतके की, त्याच्या बचावाची तजवीज न केली जाती तर, ते पार नाहीसे होण्याची भीति होती. प्रिन्स् चार्लस् दि यंग प्रिटेंडर '-दुसऱ्या जेम्स राजाचा मुलगा-इंग्लंडच्या गादीवर आपला हक्क सांगणारायाच्यासंबंधाची पुष्कळशी स्मारके या 'फोर्ट विल्यम् ' मध्ये आहेत. त्या हतभागी राजपुत्राने, याच्या आसपासच आपला झेंडा उभारला होता. त्याचा प्रयत्न प्रतिकूल दैवामुळे निष्फळ झाल्यावर, तो शेवटी परत निघून गेला, तोही येथूनच. आम्ही आगबोटींतून ओबन्ला रवाना झालो. तसा बेन् नेव्हिस् स्पष्ट व पुर्ता जणों त्याच्या पूर्ण गौरवांत व वैभवांत उभा असलेला, पाहण्यास सांपडला. त्याचा तो रमणीय देखावा खरोखर उल्हासकारक होता. आह्मां लोकांना, हिंदु ૨૨૮