पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्लास्गो व हायलंडस्. ही की, इकडील पर्वतांवर सहज चढतां येते. हिंदुस्थानांतील बहुतेक पर्वत व पहाड खडकाळ असल्याने त्यांच्यावर चढतांना पाय मुष्किलीने टिकतात. पण इकडे सर्वत्र गवत उगवलेले असल्याने पाय निसरत नाही. कशाही खड्या जागेवरून बिनधोक चढतां उतरतां येते. शिवाय इकडे सांप नाहीत. तेव्हां त्यांचंही भय कमी. हिंदुस्थानांत हे विषारी जीवजंतु फार. यामुळे तिकडे, असले दुर्गम व निर्जन प्रदेश पाहात फिरणे बरेंच धोक्याचे होते. लाक ऑ पासून आम्ही आगगाडीतून सुंदर वनप्रदेशाच्या देखाव्यामधून ‘फोर्ट विल्यम्'ला गेलो. जागजागची हिरवीगार शेते व बागबगीचे, आणि ठिकठिकाणी पडणारे पाण्याचे झोत, यांमुळे वाटेत लागणाऱ्या भणभणीत माळाचा कंटाळा आणणारा एकसारखेपणा कमी होत होता. वाटेत मध्येच एखाद्या संथ सरोवराचा प्रांतभाग, किंवा जोराने वाहणारा ओहोळ लागे. आम्ही बेन् नेव्हिस्च्या नजीकसे पोहोंचलो. तसे, कोठे कोठे खबदड्यांमध्ये व जवळपासच्या पर्वतशिखरांवर बर्फाचे पाट दिसू लागले. बेन् नेव्हिस्चें आमाला चांगले दर्शन झाले. तो स्कॉटलंडांत, किंबहुना साऱ्या विलायतेंत, सर्वांत उंच पर्वत आहे. त्याचें तें खडबडीत सौंदर्य, व माथ्यावरील बर्फाचे अचळ शिरोवेष्टन, यांमुळे तो फारच शोभत होता. हे बर्फाचे शिरोवेष्टन इतकें कांहीं अढळ आहे