पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 'लॉक ऑ हॉटेल' पासून सुमारे दीड मैलावर, त्या सरोचरावर 'किल्चर्न क्यासल'चा उध्वस्त भाग दृष्टीस पडतो. त्यांतील अगदी जुना भाग सर जान क्यांपबेल यांनी इ. स. १४४० मध्ये बांधला, असे सांगतात. सुप्रसिद्ध व अढळकीर्ति सर वॉल्टर स्कॉट यांनी 'लीजेंड ऑफ माँटोज? कादंबरीमध्ये या किल्ल्याचा उल्लेख केलेला आहे. पहिले सर जान क्यांपबेल यांच्याविषयी एक मनोवेधक कथा उपलब्ध आहे. 'क्रास'ची शपथ घेऊन ते 'होली क्रुसेड'धर्मयुद्धा-साठी निघून गेले. पुढे सात वर्षे त्यांच्या पत्नीने त्यांची वाट पाहिली. ते लढाईत पडल्याचे तिला कळले. नंतर काही काळाने, तिनें, भीड व खोट्या थापा, यांच्यामुळे दुसऱ्या एका लॉर्ड मॅक्काऊडेल नांवाच्या भावी वराची मागणी कबूल केली. लग्नाचा दिवसही ठरला. त्याच दिवशी सुदैवाने सर जान किल्ल्यावर परत आले. तेव्हां त्या हतभागी वराखेरीज सर्वांना भारी आनंद झाला. सर जाननी बायकोच्या नांवें पाठविलेली पत्रे त्याने मध्येच दाबून, ते मेल्याचे तिला भासविलें होते. आणखी एका मनोहर सफरीमध्ये, आह्मी ऋशानच्या धबधब्याला गेलो. तेथे पडणारा पाण्याचा झोत-विशेषेकरून उंच अशा जागेवरून पाहिल्यास फारच-प्रेक्षणीय दिसे. इकडे एक विशेष गोष्ट आमच्या पाहण्यांत आली. ती २१६