पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वेत होते. याप्रमाणे जमिनीच्या पोटांत काम करीत कैदेत राहिल्याने त्या तट्टांना काही विशेष त्रास किंवा इजा होत असलेली दिसली नाही. त्यांची चांगली काळजी घेतात. त्यांच्यावर सरकारी अंमलदारांची देखरेख असते. पूर्वी हे काम लहान मुलें व मुली करीत. पण परलोकवासी लॉर्ड शाफ्ट्सबरी यांच्या खटपटीने याविषयी कायद्याने मनाई झाली आहे. या कामी त्यांना लोकमताचेही पाठबळ होते. तेव्हांपासून तट्टे उपयोगांत आली. कोळशांचे मोठमोठे थर किंवा पडदे असतात. त्यांच्यांतून तो वजनदार कुदळींनी खोदून काढतात. त्यांतील एक कुदळ मलाही अजमावून पाहण्यासाठी पुढे केली गेली. पण आपल्या इतर कर्तबगारीमध्ये कोळसा खोदण्याचीही भर टाकण्याविषयी मी साशंक झालो. तेथील कोळशाचे बरेचसे नमूने मला नजर मिळाले. सृष्टिदेवतेची किती तरी विचित्र भांडारे आहेत. त्यांपैकी या एकांत शिरून येण्याच्या या प्रसंगाचे योग्य स्मारक म्हणून, ते नमूने मी आस्थापूर्वक जपून ठेवणार आहे. आजचा हा अनुभव अनेक रीतींनी अपूर्व व आनंददायकसा होता. आम्ही खाणीत उतरलों त्या दिवशी सुट्टी होती. सर्व शाळा बंद होत्या. आमी तेथे गेल्याची बातमी त्या खेड्यांत तेव्हांच पसरली. तिच्यामुळे तेथे एकच गडबड उडाली. आमच्या मोटारभोंवतीं मुलांमुलींची गर्दी जमली. घरांची दारे व खिडक्या २१४