पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्लास्गो व हायलंडस्. त्यांना खाणे घालण्याची वेळ झाली.तसे,सारी कोंबडी त्याच्यासाठी येत असलेल्या खाद्याच्या पाठोपाठ मोठ्या गडबडीने व उत्सुकतेने धांवली.ती फारच गमतीची व मजेदार दिसली. दुसरीकडे शेतकीची यंत्रे ठेविलेली होती. कृत्रिम खताच्या द्वारे पिकाची सुधारणा, आणि त्यांना रोग न होण्याच्या उपायाचे अनुभव चालले होते. तेथे पाहिलेल्या व्यवस्थेवरून, हे कॉलेज उपयोगी व महत्त्वाचे काम करीत होते हे स्पष्ट दिसत होते. कोण्या ना कोण्या रीतीने ही व्यवस्था हिंदुस्थानांतही अमलांत आणली गेली तर फायदाच होईल. गेल्या थोड्या वर्षांमध्ये, शास्त्रीय पद्धतीच्या शेतकांचे शिक्षण, व त्या कामाला उत्तेजन देण्याचा, तिकडील सरकार, पुष्कळ प्रयत्न करीत आहे. ही सुदैवाची गोष्ट होय. ___ ग्लास्गोजवळच लहानशा खेड्यामध्ये एक कोळशाची खाण आहे. तिच्यांत उतरून, ती आमी नीट फिरून पाहिली. हा अनुभव चमत्कारिकच. तरी तो आझाला आवडला. एका मोठ्याशा पिंजऱ्यात उभे राहून, आह्मी दिवसा, खाली अंधेरांत उतरलो. भूगर्भातील ते रस्ते घाणेरडे व निरुंद होते व तेथे फारच काळोख होता. ते भाग नीट पाहता यावे म्हणून आह्मांला एकेक 'डेव्हीस ल्यांप' दिलेला होता. खाणींत जागजागी खोदलेला कोळसा लहानशा गाड्यांत घालून, तट्टांकरवीं खड्डयाच्या तळाशी नेला जात होता; व तेथून तो वर ओढून २१३