पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. प्रमुख कारखानदार ' मेसर्स बार ट्रे अँड कंपनी' यांचा भारी मोठा व अफाट कारखाना पाहून येण्याचा बहुमान मिळाल्याचा मला आनंद वाटला. त्या कारखान्यांत शेकडो लोक काम करीत असतात. मिस्टर गिलक्राइस्ट यांनी कृपा करून बरोबर येऊन सर्व कारखाना फिरून दाखविला. तेव्हां तेथें बनत असलेल्या अजस्र जहाजांसंबंधी त-हेत-हेची कामें पाहून, मोठी गंमत वाटली. तेथील लोक सभ्य व आदरातिथ्य करणारे असून त्यांनी आम्हांला 'लंच '-फराळा-ला बोलाविलें. या शहरा लगतच शेतकीचें कॉलेज व तत्संबंधी ‘एक्स्पेरिमेंटल फार्म '-प्रयोग करून दाखविणारे शेत आहे. तें दुसरे दिवशी आम्ही पाहून आलो. तेथे शेतकामाच्या निरनिराळ्या शाखेसंबंधी अनुभव घेण्याची पुष्कळशी कामें चालू होती. ती आम्ही पाहिली. त्यांत लोणी काढण्याचे व 'चीज'पनीर-तयार करण्याचे, ही कामें विशेष पाहण्याजोगी होती. येथून हे जिन्नस, पृथ्वीवरील दूरदूरच्या भागांत पाठविले जातात असें कळले.कृत्रिम त-हेनें कोंबड्यांची अंडी उबवून, 'फॉस्टर मदर'दाई-ठेवून, आणि वरून खाऊ घालून, कोंबडी तयार करण्याची रीतही आम्ही पाहिली. हे कोंबड्यांचे खुराडे फारच प्रेक्षणीय होते. कोंबड्यांच्या साऱ्या वेणी राखलेल्या होत्या. त्यांतील नरांचे नाना रंगांचे तुरे, फण्या, व पिसारे यांचा एक फार उमदा व अजब देखावा दिसत होता.आह्मी तेथे असतांना