पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग सोळावा. ग्लास्गो व हायलंडस्. एडिनबरो शहर 'बॉनी स्कॉटलंड ' सुरम्य स्कॉटलंड - देशामध्ये भारी सुंदर व मजेदार म्हणून प्रसिद्ध आहे. ह्याचप्रमाणे उत्तरेकडील भागांत उद्योगधंद्यासंबंधाने ग्लास्गो हे मुख्य शहर आहे असें ह्मणतां येईल. तेथील वस्ती गजबजलेली असून, लोकसंख्या साडेसात लाखांवर आहे. या लोकसंख्येच्या मानाने साऱ्या विलायतेत ते दुसरें शहर ( लंडनच्या नंतर ) असण्याचा अभिनंदनीय बहुमान त्याला मिळतो. तें शहर क्लाईड नदीवर वसलेले आहे. ती नदी, आसपासचा कोळशांच्या खाणीचा प्रदेश, व लोखंडाचे कारखाने, आणि तेथील लोकांचा दीर्घोद्योग व साहसी स्वभाव, इतक्यांवर त्या शहराचे व्यापारविषयक महत्त्व अवलंबून आहे. या कारखान्यांतून निघणाऱ्या अतोनात धुरामुळे, हे शहर काळ्या व कळकट धुळीचे अधिष्ठान झालेले आहे. तेथील मुख्य धंदा नवीं जहाजे व गलबतें बांधण्याचा. तेथील एक २११