पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. असा काही ठरविण्यांत आला नाही. केवळ विविध ठळक. ठळक विचारांचा विनिमयसा चालला होता. __ या व्याख्यानानंतर मलाही चार शब्द बोलण्याला सांगण्यांत आले. त्याप्रमाणे मी थोडेसें भाषण केले. ते कौतुकानें, कृपादृष्टीने व लक्षपूर्वक ऐकिले गेले. पुढे त्या शाळाकमेटीच्या सभासदांनी माझी खात्री केली की, मी उल्लेख केलेल्या प्रश्नांचा, ते लक्षपूर्वक विचार करीत आहेत. मी सुव्यक्त केलेली कांहीं रहस्ये त्यांनी पूर्वीच ग्रहण केलेली होती, आणि बाकीची समजून घेण्यासाठी डॉक्टर खेडकरांच्या नेतृत्वाखाली, ते. होईल तितका प्रयत्न करीत होते.