पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. डॉक्टर खेडकर यांच्यासारखे सुशिक्षित हिंदी गृहस्थ या ठिकाणी आपल्या तत्त्वशास्त्रांतील अत्युच्च रहस्यांवर, सार्वराष्ट्रीय श्रोतृसमाजापुढें, विशदपणे पाठ सांगत असलेले पाहून मला अभिमान वाटला व एक त-हेचे स्फुरणही आले. त्यांनी ' सॉक्रेटिक '–प्रश्नोत्तररूपाची-विवेचनपद्धति स्वीकारिली होती. तेथे ' सत्य म्हणजे काय ' हा एक प्रश्न वादविवादाला निघालेला होता. त्याच्या उत्तरांत अनेक व्याख्या सांगण्यांत आल्या. त्यांतील काही बऱ्याच मनोरंजक होत्या. त्या प्रश्नाचे एक उत्तर, 'घडणाऱ्या गोष्टींच्या परंपरेशी विचारपरंपरेची जुळणी राहणे, ' असे होते. दुसरी काही उत्तरें, 'जे जे सुदर आहे तें तें सर्व सत्य आहे. ' ' सत्य म्हणजे मेळ. ' ' सत्य ह्मणजे ज्ञान, प्रेम, व बुद्धि. ' 'कुरूपता मणजे पूर्णतेला न पावलेलें सत्य.' ' सत्य म्हणजे सर्व कांहीं वस्तुमात्र.' अशी होती. पुढें । सत्य कोठे वास करितें, ' हा प्रश्न विचारिला गेला. त्याला, ' सत्य आकाशामध्ये राहते. ' असे उत्तर मिळाले. " आकाश झणजे काय ?' या प्रश्नाला, ' आकाश म्हणजे जाणीवपणाचा-अस्ति या ज्ञानाचा-गुण,' असा जबाब दिला गेला. नंतर 'सत्य मनामध्ये वास करितें, ' असा खुलासा करून · विचाराच्या क्रियेला व्यापून राहणारे ते मन, ' अशी त्याची व्याख्या दिली गेली. या थोडक्याशा उल्लेखावरून, तेथें चाललेल्या कार्याची काहीशी कल्पना येईल. तेथे ठाम निर्णय २०९