पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समुद्रांतील सफर. प्राचीनकाळी एशियाखंडामध्ये खरें उद्भत झालेले पहिल्या प्रतीचे साम्राज्य हिंदी आर्य लोकांचे. त्यांनी प्राच्य दिग्भागामध्ये वसाहती स्थापन केल्या. ही गोष्ट माझ्या सं. १९१२ साली केलेल्या मलाया द्वीपकल्पाच्या सफरीमध्ये निदर्शनास आली होती. त्या आर्य लोकांच्या बुद्धिसामर्थ्याची एक कला मात्र जर या सागरापलीकडे वसाहती करणे कायम ठेवून, त्यांचा विस्तार करण्याच्या कामी खर्ची पडली असती, तर आपल्या त्या हिंदी साम्राज्याचा किती तरी विस्तार झाला असता ! पण हे विषयांतर झाले. या सफरीने ग्रेट ब्रिटनचे वैभव व सामर्थ्य यांची मला फार चांगली कल्पना आली,एवढेच सांगण्याचा माझा हेतु होता. आजकालची मोठीशी आगबोट म्हणजे एक लहानसें तरतें शहरच. तिच्यामध्ये सर्व गोष्टी अगदी संकुचित प्रमाणावर असतात इतकेंच. आगबोट सर्व त-हेनें सज्ज ठेवण्याला अगदी नवे नवे शोध व तजविजी, आणि उतारूंना सर्व तन्व्हेची सोय, सौख्य व चैन सहज प्राप्त होण्याची सर्व साधने तेथें जशी केंद्रगत दृष्टीस पडतात. तीच शहरामध्ये निरनिराळ्या स्थळी पसरलेली असतांना प्रेक्षकांच्या मनावर जो परिणाम होतो, त्यापेक्षां तो येथे पुष्कळच मनावर ठसतो. म्हणूनच नवख्या उतारूला अशी सफर एक त-हेचे प्रत्यक्ष शिक्षणच होय, असें मी म्हटले आहे. माझ्याशी में प्रेमळ वर्तन ठेविले गेले व सभ्यपणा दाखविण्यांत आला, आणि मला समाधान व आराम वाटण्यासाठी