पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ज्या पुष्कळशा किरकोळ गोष्टी केल्या जात, त्या सर्वामुळे मला फार संतोष वाटला. या ब्रिटिश लोकांच्या अगदी प्राचीनकाळच्या स्थितीच्या उपलब्ध वर्णनाच्या मानाने, त्यांच्या या विसाव्या शतकामध्ये त्यांनी बहुतेक प्राच्य राष्ट्रांतील लोकांइतपत सभ्यपणा व सफाई संपादन केली आहे, असे दिसून येते. पण प्रकाशाप्रमाणे खरी सुधारणा सुद्धा पूर्वेकडूनच पैदा होते, हे खरे नव्हे का ? या सफरीमध्ये आणि पुढेही लोकांशी झालेल्या संभाषणावरून मला असे आढळून आले की, ब्रिटिश लोकांना हिंदुस्थानांतील महाभारताविषयीं यत्किंचितही माहिती नसते या गोष्टीचे मला बरेंच आश्चर्य वाटले. कित्येक युगांपूर्वी, हिमालयाखाली ज्वराचे मायघर अशा तराईमध्ये, किंवा नर्मदेच्या खोऱ्यामध्ये राहणारे, मूळचे जंगली लोक, यांच्याशी समान स्थितींत सारे युरोप असल्या वेळी, आम्ही लोक सुधारणेच्या बाबतींत किती पुढे गेलो होतो याची साक्ष त्या सुप्रसिद्ध महाकाव्यावरून पटते. महाभारताचा साऱ्या हिंदुस्थानांत प्रसार झाला होता, अशा काळी युरोपांतील सारे रहिवासी जंगली लोकांहून क्वचितच अधिक सुधारलेले होते. त्यांना विद्या व कला अवगत नव्हत्याच. तत्त्वज्ञानाचे नांव सुद्धां ठाऊक नव्हतें. युरोपांतील काही प्राचीन शहरांची वर्णने माझ्या वाचण्यांत आली आहेत. त्यांवरून, माझ्या मते, ती शहरे किंवा त्यांच्या जागी आलेली आधुनिक नवीं शहरें, यांची आपल्या कडील