पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पोहोचविण्यासाठी मुंबईस धक्यावर किती तरी मंडळी आली होती. त्यांच्या शुभेच्छेचे प्रत्यक्ष द्योतक असे खरेच गाडीभर पुष्पगुच्छ व पुष्पहार मला अर्पण करण्यांत आले होते.. स्नेहाची खरी किंमत व मनुष्यस्वभावांतील किती तरी चांगुलपणा यांची परीक्षा अशा वेळीच होते. __सर्वच नवें नवें, अतएव रमणीय, या नात्याने 'यारा" आगबोटीवरील पहिले बरेच दिवस सुखासमाधानांत गेले. हा काल निवळ मोकळेपणाचा व स्वतंत्रतेचा. भोजनाच्या मधील वेळ मंडळीच्या मुलाखती, संभाषणे, आणि आगबोटीच्या डेकवरील मोकळ्या जागेवर मजेने फिरणे, सवरणे यांतः आनंदांत निघून जात असे. मधून मधून खेळ व इतर करमणुकीचे प्रकार यांची तरतूद होत असे. जातिविषयक फरक विसरून जाऊन बऱ्याच नव्या ओळखी झाल्या. जुन्या,. फार दिवस अंगी खिळून दाढर्य पावलेल्या, प्राच्य चाली सुटून, युरोपियन तन्हांची संवय लागण्याला अर्थातच काही दिवस लागले. ही सफर एक प्रत्यक्ष शिक्षणच. आजकालच्या इंग्रजी आगबोटीवर काही दिवस काढल्यानंतर या नवखंड भूमंडलावरील सर्वांत प्रमुख दर्यावर्दी राष्ट्राच्या सामर्थ्याची खरी कल्पना पूर्णपणे लक्षात आल्यावांचून राहत नाही. फारच प्राचीनकाळचे हिंदुस्थान आणि हल्लींचे ग्रेट ब्रिटन यांच्यामधील फरक मुख्यत्वे दिसतो, तो यांतच.