पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आपोआपच उच्च ध्येयांमध्ये तन्मयशा होतात. हे सम्मेलन पाहून मला प्राचीन ऋषींच्या सत्रांचे स्मरण झाले. ती सत्रे प्राचीन काळी वनप्रदेशांतील प्रशांत व एकांत स्थळी होत असत. तेथें मुमुक्षु लोक ज्ञानसंपादनासाठी जात. त्या प्रसंगी सत्याचे निरूपण आतुर श्रोतृवृंदाच्या कर्णरंध्रांवर पडत असे. या प्रसंगी, बुद्धदेव मोकळ्या हवेत मैदानांत उपदेश करीत असत, त्या दिवसांचेही कोणाकोणाला स्मरण होण्याजोगें होतें.. अशा सम्मेलनामध्ये सर्व त-हेच्या धर्मपंथांतल्या लोकांना एकत्र जमून, धार्मिक प्रश्नासंबंधी विचारविनिमय करण्याला. संधि मिळते इतकेंच नसून, त्याच्यापासून नैतिक व धार्मिक तत्त्वांच्या निरनिराळ्या रूपांवर लक्ष वेधण्याला व विचार केंद्रगत करण्याला स्फूर्ति येते. तसेंच नवीन शोध व सुशीलता यांना उत्तेजन मिळते. सामान्यजनसमूहाच्या मनावरही अशा. सम्मेलनाचा चांगला परिणाम घडल्याशिवाय राहात नाही. या जगांत धर्माची खरी किंमत काय आहे, याविषयी सामान्यजनसमूहाला-त्यांतही पाश्चिमात्य जनसमूहाला--प्रसंगोपात्त जाणीव करून दिली जात राहणे, अगदी अवश्य आहे. कारण, धर्माच्या व्यवहारावरील वजनाच्या बाबतीत आपण एक त-हेची तद्बाह्य व तद्वरिष्ठ अशी वृत्ति ठेवतो, असे दाखविणारे सुशिक्षित व इतरही पुष्कळसे लोक त्या समाजामध्ये दृष्टीस पडतात.. २०८: