पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. देखावा माझ्या साध्या रहाणीच्या कल्पनेला अगदी अनुरूप होता. त्यांनी, याप्रमाणे जनरूढीला धाब्यावर बसविल्यामुळे, नुकसानाच्या ऐवजी त्यांचा फायदाच होत असल्याचे दिसले. कारण ती बहुतेक लालबुंद, आरोग्याची मूर्तिमंत चित्रंच दिसत होती. पहाडी प्रदेशांत राहणाऱ्या लोकांना शारीरिक व मानसिक आरोग्य पूर्णपणे मिळते, अशी सामान्यतः कल्पना आहे. स्कॉटलंड मध्ये बहुतेक लोक त्या स्थितीचा उपभोग घेत असल्याचे प्रत्ययास येत होते. एडिनबरोमध्ये असतांना मी मोटारने पीबल्स येथे गेलो. त्या वेळी सुदैवाने तेथे ' इंटरन्याशनल समर स्कूल'चे वार्षिक सम्मेलन चालले होते. तें हैड्रोपाथिक हॉटेल' मध्ये भरले होते. त्यांतील प्रशस्त दालने व आसपासचा रमणीय भूभाग, हे त्या संम्मेलनासाठी अगदी हवे तसे योग्य स्थळ होते. खुद्द ग्रेटब्रिटन, अमेरिका व इतर पुष्कळसे देश, यांच्या मधून तेथे सुमारे दोनशें 'डेलिगेट्स'–प्रतिनिधी-आलेले होते.तेथे धर्म व नीती यांच्यासंबंधी सांप्रदायिक भेदाभेद लक्षांत न आणतां ऊहापोह चालला होता. प्रमुख मंडळी व्याख्याने देत होती. धार्मिक विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण करण्यासाठी, प्रवचनें चालली होती. उघड्या जागेत, मोकळ्या हवेत, अनुपम सुंदर व मोहक वस्तूंनी व्याप्त स्थळामध्ये, हिरण्मय सूर्यतेज सपाटून वर्षत असतांना, नितांत महवाच्या आत्मानात्मविषयक गूढ तत्त्वांकडे मन वळून, चित्तवृत्ती २०७