पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 'पियर्स'-खांब-बारा फूट व्यासाचे आहेत. ते पोलादी नळाचे असून त्यांची उंची तीनशे सत्तर फूट आहे. रेलवे लाईन, महापूराच्याही वर, एकशे साठ फूटांवरून नेली आहे. या अजस्र कामाला पन्नास हजार टन पोलाद लागले. तें पके जखडण्याला ऐशी लक्ष, पच्ची केलेले 'रिव्हेट्स'-लोखंडी खिळेठोकलेले आहेत.'क्याँटिलिव्हर'च्या नळांतील वांकविलेले पोलादी पत्रे, सारखे ओळीने मांडले तर, त्यांची लांबी बत्तीस मैल होईल. या पुलामधील पोलादी कामाच्या सपाटीचा विस्तार पंचवीस एकर आहे. त्याला एकवार तेलिया रंगाचा हात देण्याला अडीचशे टन रंग व पस्तीस हजार ग्यालन अळशीचे तेल लागतें ! या स्कॉटलंडच्या राजधानीत नवीनच जाणाऱ्याच्या लक्षांत एक तन्हा अवश्य येते. तेथे .पुष्कळशी मुले व मुली रस्त्यांत अनवाणी फिरत असतात. गरीब लोकांची बहुतेक मुले, बुद्धया आवडीनें, किंवा निरुपायाने, हिवाळ्यांत व उन्हाळ्यांत सुद्धा, पायांत कांहींच घालीत नाहीत, असे मला सांगण्यांत आले. त्यावेळी मी ब्रिटिश बूट वापरण्याची दुस्सह वेदना भोगीत होतो. त्या मुलांना पाहून मला वाटले की, इकडील लोक 'फ्याशन' रूपी 'टायरंट'-जबरदस्ता-ला धाब्यावर बसवून, सरसकट हिंदुस्थानांतल्याप्रमाणे मोकळे व सैल जोडे वापरतील-निदान हिवाळ्याशिवाय बुटांना बिलकुल फांटा देतील तर, त्यांना किती तरी सुख व आराम होईल. एडिनबरोमध्ये अनवाणी फिरणा-या मुलांमुलींचा २०६