पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. : फोर्थ नदीवरील पूल येथून जवळच आहे. तो पाहून आल्याशिवाय, एडिनबरोची सफर, खरी पुरती झाली, असें ह्मणतां येत नाही. साऱ्या दुनियेतील शिल्पकलेच्या अद्भुत महत्कृत्यांपैकीच हा एक पूल आहे. लीथ येथील गोदीतून एका लहानशा आगबोटीत बसून आह्मी तो पाहण्यास निघालों. वाटेंत लॉर्ड रोजबरी यांची डलमेनी येथील सुरेख इस्टेट लागते. त्या इस्टेटीमध्ये एक अप्रतिम महाल आहे. त्याच्या पुढें थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत भव्य व रमणीय वृक्षराजी लागलेल्या आहेत. त्यांच्या गर्द पानांमधून, तो महाल किंचित् अस्पष्टसा दिसत होता. 'फोर्थ' पूल आठ हजार फुटांपेक्षा अधिक लांब, आणि तळच्या पायापासून साडेचारशे फूट उंच, आहे. त्या पुलाला 'क्याँटिलिव्हर' किंवा सारखे लांबच लांब लोखंडी 'गर्डर'तळई-दोन कंस एकत्र जोडून झालेल्या आकाराचे लावलेले आहेत. खालच्या भागाचा कंस नेहमींच्या स्थितीत असून तो रेलवेचा भार दाबाच्या द्वारे आणि वरच्या भागाचा कंस उलट स्थितीत बसविला असून तो तणाव्याच्या द्वारें तोलतो. दोन्ही भाग एकमेकांत खूप मजबूत सांधलेले आहेत. सारे काम खरोखर कधीच धक्का न लागण्याजोगेंसें झालेले दिसते. या 'क्याँटिलिव्हर्स,' बांधून काढलेल्या दगडी खांबांवर ठेवलेल्या आहेत. त्या खांबांचा पाया, पाण्याखाली पन्नासपासून नव्वद फूट, इतका खोल नेलेला आहे. तळाशी त्यांचा व्यास सत्तर फूट, व माथ्याला साठ फूट, आहे. या 'क्याँटिलिव्हर्स'चे मुख्य १४