पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. काळा मध्ये सरासरी तीन हजारांवर विद्यार्थी, विशेषेकरून वैद्यक-शाखेत, भरती होतात. या युनिव्हर्सिटीमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थिणी आहेत. ही गोष्ट, पाश्चिमात्य देशांतील स्त्रियांच्या प्रगतीची द्योतक म्हणून, लक्षात ठेवण्यासारखी आहे. वैद्यक आणि शस्त्रक्रिया या संबंधांत एडिनबरोची फारां दिवसांपासून प्रख्याती आहे. या शाखांमध्ये भराभर अतिशय वाढ झाल्यामुळे या युनिव्हर्सिटीमधील 'लेबोरटरीज्'–सप्रयोग शास्त्रीय शिक्षण देण्याच्या जागा-व वैद्यकीच्या वर्गाना शिक्षण देण्यासाठी दालने, यांच्या साठी जवळच स्वतंत्र व प्रशस्त चाळी बांधाव्या लागल्या आहेत. येथील सान्या वैद्यकी कॉलेजांत मिळून सुमारे दोनशे ‘एशियाटिक'प्राच्य--विद्यार्थी आहेत, त्यांच्यांतील पुष्कळच मोठा भाग. हिंदी विद्यार्थ्यांचा आहे. हे एकून मला कौतुक व समाधान वाटले. या शहरांतील इमारतीचे बांधकाम रेतीच्या दगडाचे आहे. तो दगड चांगला मजबूत व टिकाऊ आहे. त्यामुळे इमारती, बाह्य स्वरूप भक्कम दिसते. या देशांतील बरीचशी जमीनदार व घराणदार मंडळी, एडिनबरो मध्येच राहते. शिवाय तेथे शिक्षणसंबंधी सोई पुष्कळ असल्यामुळेही बरीचशी मंडळी येथे येऊन राहते. या शहरांत अनेक सुंदर चौक, व प्रशस्त राजमार्ग आहेत. तेथील बांधणुकीची तन्हा मात्र काहींशी एकच जातीची तरी पायाशुद्ध आहे. २०४