पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. मंडपाची तहा-अमलांत आणिलेली आहे. तिच्यामुळे चोहीकडे मोकळी हवा खेळण्याला सवड राहते. तेथे सुमारे ९०० रोगी राहण्याची सोय आहे. शिवाय, प्रतिवर्षी स्कॉलंडच्या सर्व भागांतून ३०००० वर बाहेरचे रोगी औषधासाठी येतात. लोकांनी मृत्युपत्राअन्वये दिलेल्या कायमच्या देणग्या आणि आपखुषीने दिलेल्या वर्गण्या यांच्यावर याचा खर्च चालतो. तेथे १२० नर्सेस् किंवा दाया, यांची एक लहानशी फौजच कामावर आहे. ____येथे आणखी एक इमारत मनांत भरण्यासारखी आहे. ती येथील युनिव्हर्सिटीची होय. तिच्यावर फारच डौलदार घुमट आहे. त्या घुमटावर, हाती ज्ञानाची मशाल धरलेला युवकाचा पुतळा आहे. त्यामुळे ती इमारत फारच उठून दिसते. तेथील पुस्तकालयांत सुमारे दोन लक्ष पुस्तकें व सात हजार हस्तलिखित ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांपैकी पुष्कळस ऐतिहासिक महत्त्वाचे आहेत. या युनिव्हर्सिटीच्या अध्यापक वर्गामध्ये धर्म व नीती, कायदेकानू , वैद्यक, वाङ्मय, गायन वादनादि ललितकला, आणि भौतिक शास्त्रे, अशा सहा शाखांमध्ये मिळून ४० प्रोफेसर्स नेमलेले आहेत. तेथील 'फेलोशिप्स् '–पगारी उपशिक्षकांच्या जागा,-' बर्सरीज् '–पारितोषकें,-आणि 'स्कॉलरशिप्स्'–पगारी विद्यार्थ्यांच्या जागा,-मिळून दोनशेच्या वर व सुमारे अकरा हजार पौंड वार्षिक किमतीच्या आहेत. तेथे प्रत्येक 'सीझन'-कार्यक्रम सुरू करण्याच्या नियमित २०३