पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. भरत असे. अलीकडे तेथें 'कोर्ट आफ सेशन्स' भरते. तेथे एक भारी मोठे पुस्तकालय आहे. त्याच्यांत ३२०००० वर छापील पुस्तके, पुष्कळसे हस्तलिखित ग्रंथ, व वाङ्मयविषयक विलक्षण व प्रेक्षणीय वस्तू ठेवलेल्या आहेत. तेथील पुष्कळशा पेढ्या व सराफी दुकानें, यांविषयीं या स्कॉटलंडच्या राजधानीची प्रसिद्धि आहे. त्यांच्यावरून या लोकांच्या काटकसरी स्वभावाची साक्ष पटते. येथे 'पीपल्स व्यांक' नावाची एक लहानशी व साधीच संस्था आहे. ती मी पाहिली. ती पाहून मला मोठे समाधान झाले व आनंद वाटला. ती सहकारी पतपेढ्यांच्या तत्त्वावर काम करिते. तेथे मेंबर लोकांना हलक्या व्याजाने कर्ज मिळतें व त्या द्वारे त्यांना राहत्या घराचे मालक बनण्याला साधन होते. विद्यालये व विद्यापीठे यांना मिळालेल्या देणग्यांसंबंधाने, हे शहर भारी भाग्यवान् आहे. मुलांचे संगोपन व शिक्षण, यासाठीही येथे पुष्कळशी इस्पितळे आहेत. त्यांच्यांत 'धी हरियट ' व 'डोनाल्डसन् हॉस्पिटल,' ही विशेष महशूर व महत्त्वाची आहेत. येथील 'रॉयल इन्फर्मरी' ही अतिशय भव्य व भपकेदार इमारतींपैकी एक आहे. तिचे आवार बारा एकर आहे. तिला सुमारे पाऊणकोट रुपये खर्च आला. तिची बांधणी 'स्कॉटिश् बरोनियल स्टाइल' ची आहे. त्याच्यांत पव्हिलियन् सिस्टिम' २०२