पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. भागी राणीविषयी इंग्लिश किंवा स्कॉट लोकांच्या मनांत जो आदरभाव आहे, त्यांच्या मनोवृत्तीप्रमाणे मला आपली मनोवृत्ति करता आली नाही. तिचे या राजवाड्यांतील कमरे अद्यापि चांगल्या स्थितीत ठेवलेले आहेत. तिचा बिछाना, हल्ली त्याची आरास जीर्ण झालेली असली तरी, जपून ठेवला आहे. कशीद्याचे व जरतारी काम करणे तिला फार प्रिय असे व तिची ती मुख्य करमणूक होती. तेव्हां हे काम करतेवेळी उपयोगी पडणारी अशी तिची कशीद्याच्या सामानाची पेटी व अशीच तिची दुसरी स्मारकेंही ठेवलेली आहेत. तसबिरींच्या दालनांत शंभरांवर स्कॉटिश् राजांच्या तसबिरी टांगलेल्या आहेत. त्यांचे काम साधारण ओबडधोबडच आहे.तरी ते चित्रपट पाहून 'स्कॉटिश्' राजमुकुट धारण करणाऱ्यांवर ओढवलेल्या देवाच्या चमत्कारिक फेयांचे स्मरण झाल्यावांचून राहात नाही. महाराणी व्हिक्टोरिया, किंग एडवर्ड, व हल्लींचे शहानशहा, या राजवाड्यांत थोडे दिवस राहून गेले आहेत. या राजवाड्याच्या जागी पूर्वी 'होली रूड'–पवित्र क्रास-ला समर्पण केलेला एक 'अंबे'-मठ-होता, त्यावरून या राजवाड्याला हे नांव पडले. येथील 'पार्लमेंट हौस'च्या पुढे दुसऱ्या चार्लस राजाचा एक घोड्यावर बसलेला सुरेखसा पुतळा आहे. सन १७०७. साली दोन्ही राज्ये एक झाली तोंवर, तेथें 'स्कॉटिश् पार्लिमेंट' २०१