पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 'क्रौनरूम'-राजमुकुटाच्या कमऱ्या-मध्ये स्कॉटिश् राजमुकुट, आणि इतर राजचिन्हें व जवाहीर वगैरे, आम्ही पाहिले. प्राचीन स्कॉटिश राष्ट्रीयपणा व स्वातंत्र्य यांची ही स्मारकें आहेत. जेम्स राजाला चोरून बाप्तिस्मा देण्यासाठी एका झरोक्यांतून २०० फूट खाली सोडले होते, तो झरोकाही आम्ही पाहिला. त्या किल्ल्याभोंवतीं खूप खोल खंदक आहे व बुरूज उंच व खडे आहेत. रस्ते वळणावळणाचे असून त्यांच्यांत पायऱ्या आहेत. या सर्व प्रकारावरून मला प्राचीन रजपूत किल्ल्यांचे स्मरण झाले. ते यांच्याहून पुष्कळ मोठे, व एखाद्या गांवाप्रमाणे विस्तृत असतात. या किल्ल्यांतील शिबंदीत बरेचसे शिपाई हिंदुस्थानांत नोकरी करून आलेले होते. याचे मला कौतुक वाटले. त्यांच्या मुख्य अंमलदाराने येऊन आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या. त्या शिपायांना सुद्धा, पुनः आह्मां हिंदी लोकांना पाहून आनंद वाटलासें दिसत होते. ___ 'सफ्रेजेट्'-मताभिलाषी–बायांचा आततायीपणा व दांडगाई, यांमुळे होली रूड राजवाडा बंद होता. तो पाहण्यासाठी लंडनला तार पाठवून परवानगी आणविली. हा राजवाडा सुरेख आहे. पण तो विंड्सर किंवा फान्टेन्ल्बोच्या तोडीचा नाही. फ्रान्स देशांत नेपोलियनचे नांव सदासर्वदा कानी येते. तद्वत् स्कॉटलंडमध्ये जिकडे तिकडे 'मेरी क्वीन ऑफ् स्कॉट्स' (स्कॉटलंडची राणी मेरी) इचे नांव ऐकू येते. या हत २००