पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉटलंडची राजधानी. 'प्रिन्स ऑफ वेल्स्' असतांना, महाराणी मेरीशी लग्न केल्यावर लौकरच. साऱ्या दुनियेतील अप्रतिम शोभिवंत राजमार्गापैकी एक म्हणून या प्रिन्सेस स्ट्रीटची प्रसिद्धि आहे. या रस्त्यावरून सहल करतांना खरोखरीच भारी आनंद होतो. तो मैलभर लांब आहे. त्याच्यासमोर सुरेखसे बगीचे असून सर वॉल्टर स्कॉटचे प्रचंड स्मारक बांधलेले आहे. ते दोनशे फूट उंच आहे व त्याच्यामुळे त्या राजमार्गाला चांगली शोभा आलेली आहे. त्याच्यावरून पलीकडे सुरेख हिरवीगार उतरती मैदाने, आणि एक खोल खोरे असून, त्याच्याही पुढे एकावर एक सुंदर व रम्य उंचवटे, चित्रासारखे दिसतात. तिकडेच शहराचे जुने भाग बरेच स्पष्ट व मजेदार पाहण्यांत येतात. त्या सर्वांच्या वर 'सेंट जाइल्स'चे भव्य 'क्याथीडल' क. पलीकडे येथील इतिहासप्रसिद्ध किल्ला ही आहेत. एडिनबरोचा किल्ला ब्रिटिश इतिहासामध्ये एक चिरस्मरणीय स्थळ आहे. इंग्लंड व स्कॉटलंडची राज्ये एकत्र झाली त्यावेळी या दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान ठरलेल्या कराराअन्वये हा किल्ला नेहमी चांगला दुरुस्त व लढण्यास जय्यत राखला पाहिजे, असा ठराव आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी इंग्लंडांत आपापसांत यादवी चालू होती. तेव्हां एडिनबरो शहर बंडखोरांच्या कबजांत आणि किल्ला तत्कालीन सरकारी फौजेच्या हातीं होता. या किल्ल्यांत शेकडो वर्षे स्कॉटिश् राजांची राजधानी होती. तेथील १९९