पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग पंधरावा. स्कॉटलंडची राजधानी. 'निसर्गदेवतेच्या एकाच स्पर्शमात्राने सारे जग आप्त होतें.' शेक्सपियर. 'वस्तुमात्राच्या प्रभेमध्ये पुढे सरा. निसर्गदेवता तुमची शिक्षक होऊ द्या.' वर्डस्वर्थ. स्काट व बर्न्स यांच्या भूमीमध्ये पोहोंचतांच, माझ्या मनामध्ये जी आनंदकलिका उत्पन्न झाली, तिचा मला सहसा विसर पडणार नाही. म्यान्चेस्टरहून निघाल्यावर उत्तरेकडील कोळशांच्या खाणी असलेल्या भागांतून जातांना, निबिड व कृष्णवर्ण धुराने सारें आकाश अभ्राच्छादित झालेले होते. अशा स्थितीत एडिनबरो शहराचा सुंदर देखावा पाहून, अंधारांतून निघतांच एकदम लख्ख प्रकाश दृष्टीस पडावा, तसा आनंद झाला. आम्ही तेथें प्रिन्सेस स्ट्रीट मधील 'रॉयल हाटेल' मध्ये उतरलो. खुद्द शहानशहा तेथें दोनवेळ उतरल्याचा बहुमान त्याला मिळालेला आहे. त्यांतून एकदा तर १९८