पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लोकांना त्यांतही विशेषतः तरुण मंडळीला-ही आरोग्यप्राप्तीची स्थळे निव्वळ चैनबाजी व मजा मारणे, यांचे अड्डे होतात. अशा लोकांच्या गरजा भागविण्याकरितां तव्हे त-हेचे चित्ताकर्षक प्रकार-बँड वादनाचे जलसे, गायन वादन, इतर गमती व खेळ, तमाशे, वगैरेंचा येथे मनमुराद पुरवठा असतो. हिंदुस्थानांतही-विशेषतः कोकणांत-अशी अप्रतिम स्थळे व उन्हाळी असलेल्या जागा, पुष्कळशा आहेत. पण त्यांचा फायदेशीर रीतीने उपयोग केला जात नाही, याचे वाईट वाटते. इंग्लंडांतील 'स्पा' औषधिगुणांनी युक्त झरे-यांच्या त-हेवर, ही स्थळे उपयोगांत आणण्याचा उद्योग झाला तर, युरोपियन लोक, आरोग्यप्राप्तीसाठी केरो वगैरेला जातात, त्याऐवजी हिंदुस्थानाला जाण्यासाठी त्यांची मने वळवितां येतील, असे मला वाटले. ही स्थळे मुंबईपासून सहज पोहोंचतां येण्याजोगी असली तर जास्तच सोईचे होईल. या बाबतीत जावाने सुद्धा हिंदुस्थानाला कित्ता घालून दिला आहे. गतवर्षी मी तेथे गेलो होतो तेव्हां, ही सुंदर व रमणीय स्थळे व झरे, यांचा पुष्कळच उपयोग करून घेतला जात होता, हे मी प्रत्यक्ष पाहिले. हिंदुस्थानांतील श्रीमान् लोकांनी आलेल्या संधीचा फायदा घेऊन या बाबतीत विचार करण्याजोगा आहे. बाथ येथे थोडेच दिवस राहून मी आगगाडीने निवालों. त्यावेळी परत इंग्लंडांत शहराबाहेरच्या मोकळ्या प्रदेशांतील संधिप्रकाशाचा अपूर्व देखावा पाहण्याची प्रथमच व १९६