पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. उन्हाळ्याची स्नानगृहे आहेत, त्यांवरून त्याला हे नाव पडले आहे. ही उन्हाळी व औषधिक्षारयुक्त जलाचे झरे, यांच्या योगाने या शहराला जलरूपी औषधोपचार घेण्याची फ्याशनेबल जागा ह्मणून रोमन लोकांच्या वेळेपासून आजतागायत महत्त्व प्राप्त झाले आहे. ते स्थळ पाहून माझें मन फार रमलें. व त्यावरून ते इतके लोकप्रिय कां व कशासाठी आहे, तें मला कळून आले. येथील औषधिजलाचे सेवन करण्यासाठी एलिझाबेथ राणी नेहमी जात असे, असे मला सांगण्यांत आले, यांच्या औषधिगुणांपासून फायदा करून घेण्यास येणाऱ्या लोकांच्या आरोग्यवृद्धीपुरताच नव्हे, तर साऱ्या शहराच्या फायद्यासाठीही या झऱ्यांचा उपयोग केला जात आहे, हे पाहून मला बरेंच आश्चर्य वाटले. त्या शहराला त्यांच्यापासून कमी उत्पन्न होते असे नाही. तेथील लोकांचे आरोग्य व आराम, यांच्यासाठी केलेल्या साऱ्या सोई मी पाहिल्या. त्यावरून तेथील स्थानिक अधिकारी लोकांच्या फायदेशीर व धंदेवाईक धोरणाची साक्ष पटत होती. लंडन शहरांतील 'सीझन'–ठरीव चैनीच्या दिवसां-. तील मजा मारणे-आपटल्यावर, तेथील वरिष्ठ दर्जाचे लोक बाथकडे धाव घेतात. विशेष धनाढ्य मंडळी 'कांटिनेंट' वर-युरोपांत-फेर फटक्याला जातात. आणि तिकडे आरोग्य संपादन करून ते पुनः त्याच चैनीच्या व मजा मारण्याच्या धुमश्चक्रीत घुसण्याला योग्य होऊन परत येतात. यांतील काही