पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. हे ऐकून तर त्यांना भारीच आश्चर्य वाटले व त्यांच्या मनाला कांहीसा धक्काही बसला होता असे म्हणतात. येथे अन्नमय. प्राणात्म्याची तृप्ति होण्यासाठी केलेल्या व्यवस्थांचेही वर्णन केल्याशिवाय हे प्रदर्शनाचे वर्णन पुरें होणार नाही. लहान लहान पण सुरेखशा मंडपांमध्ये सर्व त-हेच्या उपाहारांची सोय केलेली होती. तेथे 'लंचेस्'–भोजनेंव फराळ, प्रत्येकी अर्धा क्रौन-दोन रुपयां-पासून दहा शिलिंगसाडेसात रुपयांपर्यंत मिळत होते. इंग्लंडांतील बहुतेक साऱ्या सार्वजनिक प्रसंगी अशीच व्यवस्था केली जाते. तिकडे घर सोडून बाहेर व परक्याबरोबरही खानपान करण्याचा सार्वत्रिक प्रचार आहे. तो हिंदुस्थानांतील चालीरीतीच्या उलट आहे. तिकडील हवेमुळे भूक विशेष लागते. घराबाहेर काही काळ घालविल्यानंतर थकवा आलासे वाटते. _स्थळविशेष व सुरेखशी बांधणुकीची तन्हा, या बाबतीत विलायतेंतील इतर थोडींच शहरें बाथ शहराची बरोबरी करितात. ते समुद्रापासून दूर आहे. तेथे 'स्पा' किंवा औषधिगुणांनी युक्त अशा जलाचे झरे आहेत. जवळच एक त-हेच्या दगडाच्या खाणी आहेत. तेथील घरे त्याच दगडाची बांधलेली आहेत. घरांच्या सुंदर गच्च्या, चौक, 'क्रिसेंटस् ,'चंद्रकोरीच्या आकाराची स्थळे व सुंदर बागबगीचे, यांच्या मुळे तेथील देखावा मोठा रमणीय चित्रासारखा दिसतो. तेथे