पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. खुद शहानशहा, डयूक ऑफ वेस्टमिन्स्टर, डयूक ऑफ डेव्हनशायर, लॉर्ड राथ्सचाइल्ड आणि सर वाल्टर गिल्बे, अशा सारख्यांनाही इनामें मिळाली होती. शहानशहाला एका आखूडशिंगी कालवडीबद्दल पहिल्या प्रतीचे व एका हरफर्डशायरच्या खोंडासाठी दुसऱ्या प्रतीचे अशी इनामें मिळाली होती व आखूडशिंगी खोंडाच्या वर्गामध्ये त्यांना शिफारसपत्र मिळालेलें होतें. _ न्यायाधीशाचे काम करणारी मंडळी भीड, मुरवत, भय, काहीं एक मनांत न आणितां ताबडतोब निकाल देतात. त्यांच्यावर व त्यांनी दिलेल्या निकालावर, सर्व लोकांचा पूर्ण विश्वास असतो. अशी ही महनीय स्थिति आम्हांलाही प्राप्त करून घेता येईल, तर हिंदुस्थानाचे कल्याण होईल. तेथे एक घडलेली मजेदार गोष्ट मला सांगण्यांत आली. त्यावरून ब्रिटिश रीतरिवाजाची सत्यप्रियता व स्वतंत्रपणा, यांचा उत्तम दाखला मिळतो. काही वर्षांखाली इराणचे परलोकवासी शहा विलायतेस गेल्यावेळी एक प्रदर्शन पाहण्यास गेले होते. त्या प्रदर्शनांत परलोकवासी बादशहा सातवे एड्वर्ड-त्यावेळी ते प्रिन्स ऑफ वेल्स होते यांना कांहीं इनामें मिळाली; पण ती कांही सारीच पहिल्या प्रतीची नव्हती. तेव्हां युवराजाला इतरांहून कमी दर्जाची इनामें देणारे न्यायाधीश, आणि त्यांच्यापेक्षा अधिक दर्जाची बक्षिसे मिळून स्वस्थ बसणारे लोक, यांच्या राजद्रोही वर्तनाविषयी वाटलेला उद्वेग व भीति शहांनी व्यक्त केली. . त्यांतही त्या हरामखोरांना देहांत प्रायश्चित्त दिले जाणार नाही, १९३