पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. नाहीत. विलायती शेतकरी स्वतःची गरज उत्तम रीतीने भाग-- विणारे बी शोधून काढण्याकरितां दूरवर जातात. इंग्लिश प्रदर्शनांत कोणा शेतकऱ्याला इनाम मिळाले तर लोक त्याला धुंडीत राहतात. कारण, त्याच्याकडील माल जातिवंत असतो, हे त्यांना माहीत असतें. इनाम मिळणे, हीच त्या उत्तमपणाची सनद समजली जाते. लोक त्याजकडून बी खरेदी करून त्यास मदत करितात व उत्तेजन देतात. पण हिंदुस्थानांत अशांची कोणी पर्वा करीत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष होते. ब्रिस्टल येथें प्रदर्शनांत आलेल्या नगांची तपासणी चाललेली होती. ती लोकांना मोकळेपणी पाहण्याला मिळावी ह्मणून मोठमोठे ' स्टैंड्स ' चबुत्रे-केलेले होते. जमलेले लोक, चाललेले तपासणीचे काम, उत्सुकतेनें, समजुतीने, व लक्षपूर्वक पाहात व तपाशीत असत. एखाद्या वस्तूला पहिल्या प्रतीचे इनाम मिळाले तर तें कां? हा अभिलाष उत्पन्न करणारा बहुमान त्याला कोणच्या गुणामुळे देण्यात आला? याची लोक चौकशी करीत. हिंदुस्थानामध्ये उत्साहयुक्त कार्यकर्तृत्व व विश्वास दोहोंचीही लोकांमध्ये उणीव आहे. ब्रिस्टल येथे आणखी एक विशेष गोष्ट माझ्या ध्यानात आली. ती ही की, मामूली शेतकऱ्यांशिवाय चांगले संपन्न व सरदारी थाटाने राहणारे, अशा पुष्कळशा लोकांनी येथे प्रदर्शनासाठी तयार केलेल्या वस्तू पाठविल्या होत्या. अशा बड्या लोकांना देखील प्रदर्शनामध्ये इनाम मिळविण्याचा मोठा अभिमान वाटतो.. १९२