पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. फायदेशीर व्हावें; कारण, तिकडे सर्वत्र, त्यांतही, पहाडाजवळच्या भागांत फुलें हवीं तितकी सांपडतात, उत्तरेकडील भागांतील ऋतुपालट या बाबतीत अवश्य लक्षात घ्यावा लागेल. तथापि एकंदरीत हा धंदा विचार करण्याजोगा आहे. ब्रिटिश प्रदर्शनाचे उपयुक्त व कार्यक्षम उद्देश यांचें, हिंदुस्थानांतील प्रदर्शने चांगले लक्षपूर्वक अनुकरण करूं लागतील, तो दिवस हिंदुस्थानाला खचित मोठा भाग्याचा होईल.हल्ली तिकडील प्रदर्शन निवळ तमाशे. त्यांच्यापासून उपयोग थोडाच मुळीच नाही म्हणण्यासाखा-होतो. इंग्लंडांत याच्या अगदी उलट प्रकार आहे. येथील लोकांच्या अंगी व्यापारधंद्याला अवश्य असे गुण उपजतच असतात.या गोष्ट.चा पाहणाऱ्याच्या मनावर ठसा उमटल्याखेरीज राहात नाही. शेतकरी लोक अशी प्रदर्शने व तमाशे पाहण्यास जातात ते, केवळ चैनीखातर व मजा मारण्यालाच नव्हे; पण तेथे पिकाला व गुरें पैदा करण्याला काय केल्याने फायदा होईल व त्यांच्यात सुधारणा होईल, हे शोधून काढण्याकडे त्यांचे लक्ष राहते. विलायतचे शेतकरी बियांच्या निवडीविषयी काळजी घेतात ती पाहून, मला भारी आश्चर्य व कौतुक वाटले. तेथे सर्व त-हेची बीजे आलेली होती. शिवाय, ती लहान लहान वाफ्यांमध्ये पेरून त्यांचा फायदा व विशिष्ट खतें घातल्याने होणारे उपयोग, प्रत्यक्ष दाखविले जात होते. हिंदी शेतकरीही बियांची काळजी घेतात. पण या कामी ते त्यांच्या विलायती व्यवसायबंधूंइतके प्रागतिक व उत्साहयुक्त