पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मिळते. युगानुयुगें पिढीजाद चालत आलेल्या रीतीऐवजी ही चमत्कारिक पद्धत सुरू झालेली पाहूनही गाई स्वस्थ व बेदरकार उभ्या असतात. पाणी काढणे, सामान वाहून नेणे, कापणी व मळणी करणे, वगैरे सर्व कामांची . यंत्रे होती. पवनचक्कया बागेत पाणी देण्याचे कापडी व चामडयाचे नळ, व इतर पुष्कळच क्लुप्त्याही तेथें होत्या. विहिरीकरितां जमीनीत भोंक : पाडण्याचे यंत्रही होते. ते आपणा हिंदी लोकांना विशेष विचार करण्यासारखे आहे. त्याने बरेंच खोल भोंक पाडतां येत होतें, असें ह्मणतात. तरी ते अद्यापि पुर्तेपणीं अजमावलेले दिसत नाही. बेताच्या खर्चाने, पाण्याचा पत्ता लावून ते वर आणण्याजोगें एखादें यंत्र किंवा क्लृप्ती, कोणी शोधून काढली तर, त्याचे हिंदुस्थानावर भारी उपकार होतील. निरनिराळ्या त-हेचे पंप व विहिरीतून पाणी काढणे, धान्य दळणे वगैरे किरकोळ कामाला उपयोगी पडणारी लहानसर यंत्रे-इंजनें-ही माझ्या पाहण्यांत आली. या प्रदर्शनांत शिक्षणाची बाजूही सुटलेली नव्हती. लोणी व चीज तयार करणे, व मधमाशा पाळणे, ही कामें वरचेवर प्रत्यक्ष करून दाखविली जात होती. त्यामुळे प्रदर्शन विशेष मनोरंजक होत होते. इतकेच नव्हे, तर त्याची उपयुक्तताही वाढत होती. मधमाशा पाळण्याचे काम, विशेषतः हिंदुस्थानांत १९०