पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. होती. प्रदर्शनार्थ आलेली फळे फारच रसाळ, लुसलुशितएकदम तोंडात टाकावी इतकी–ब मनोहर होती. स्ट्रॉबेरी,' 'पीचेस,'नेक्टराइन्स' व द्राक्षे-पाहतांच तोंडाला पाणी सुटे. शाकभाज्या तरी कमी मनोहर होत्या असे नाही. 'टमाटे,' 'पीज,' बटाटे, 'बीन्स,' कोबी, सर्वच इतकें कांहीं सुरेख व अप्रतिम होते की, अशा भाज्या नेहमीच मिळाव्या अशी आह्मांपैकी काहींना लालसा वाटली. यांत्रिक व व्यापारधंद्यासंबंधाच्या वस्तूंची एक मोठी व महत्त्वाची शाखा होती. तिच्या निरीक्षणापासून चांगलाच उपयोग व फायदा होण्यासारखा होता. शास्त्रीय प्रगति व तिचा शेतकीच्या गरजा भागविण्याला उपयोग काही विलक्षण यंत्रकलांच्या द्वारे निदर्शनास येत होता. अशा कामासंबंधाने मोटारने केलेले आक्रमण पाहून, त्याच्या पुढे टिकाव लागणे अशक्य वाढू लागते. इकडे घोड्यांकडून जमीन नांगरण्याला दर एकरी दहा शिलिंग-साडेसात रुपये लागतात. तेच काम मोटारने साडेतीन रुपयांत होते. यंत्राने गाईची धार काढलेली पाहून किंवा ऐकून पूर्वज मंडळी-असतील तेथे खचित विस्मयचकित होतील. या यंत्राची कल्पना अशी आहे की, गाईच्या भोवती दोन रुंदट पट्टे बांधलेले व त्यांना एक विलक्षणसें यंत्र लटकावलेले असते. तेच धार काढते, व दूध धरण्याची चरवीही त्यांतच. जवळच असलेल्या एका इंजिनापासून त्याला गती MA