पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ... कोंबडी व बदके यांच्या शाखेमध्ये जवळ जवळ पंधराशें संख्या झालेली होती. त्याचे गुणमानही एकसहा चांगल्यांतलें होते. विशेष काळजी घेऊन व बीजाचा फेरपालट करून वस्तुतः किती निरनिराळ्या त-हा तयार करता येतात, ते येथे स्पष्ट दिसत होते. त्याचे मला फार आश्चर्य वाटले. आकार, पिसारा, कोंब'-तुरा-, यांचे अनेक रंग व चमत्कारिक तन्हा, यामळे ही शाखा या प्रदर्शनामध्ये, एक महत्त्वाचे व प्रेक्षणीय अंग बनलेली होती. .. प्रदर्शनार्थ आलेल्या बागायती चिजांचे दर्शन ही एक नेत्रांना अप्रतिम मेजवानीच होती. अशी बहारदार व सुंदर फुलें पूर्वी कधी माझ्या पाहण्यांत आली नव्हती. एवढ्याशा नियमित प्राकारांत असा अवर्णनीय सौंदर्याचा भपका आजवर कधीं अन्यत्र एकत्र केला गेला असेल किंवा नाही, याची शंकाच वाटते. लाल 'कारनेशन्' ची फुले अतिशय मजेदार गलाबांशी स्पर्धा करीत होती.सौम्यशीं 'स्वीट पीज' भव्य 'फुस चियास'शी नेटाने टक्कर देत होती आणि लाल शेंदरी 'जिरेनियम्स' व पांढरी तांबडी 'पेलारगोनियम्स,' आपापल्या अप्रप्रतिम रंगाच्या दंगलीत जणों मग्न झालेली होती. तसेच तेथें शीत अशा 'फर्स', लहान लहान खडकाळ बगीच्यांमध्ये चतुराईने लावलेल्या होत्या. या खडकाळ बगीच्यांतील रमणीय पुष्करण्यांच्या निश्चल जलावर शुभ्र वर्णाच्या पूर्णावस्थेला पावलेली 'वाटर लिलीज'–कमलें-वैभवश्रीने ओथंबलेली दिसत