पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. त्यांच्यामधील खोंड व पुष्कळसे बैल, फार भयंकर दिसतात. जर्सीची गुरे यांच्या अगदी उलट गरीब व सौम्य अशी होती. ती दिसण्यांत कृश,तरी दुधाला फार चांगली असतात. अलीकडे काही वर्षांपासून जर्सी व गवर्नसीची गुरें लोकांना फारच आवडू लागली आहेत. याच जातीची गुरे विशेषतः अमेरिकेला पाठविण्यासाठी खरेदी केली जातात. केरीची ठेंगणी गुरेही मी पाहिली. तेव्हां मला दक्षिणेत पंढरपुराजवळ आढळून येणाऱ्या वामनमूर्ती गाईंचे स्मरण झाले. पंढरपुराकडील गाई अगदीच दुध देत नाहीत परंतु या केरी येथील गाई, त्यांच्या आकाराच्या मानाने दुभत्याला चांगल्या असतात. मेंढरे व बकरी किती तरी प्रकारची आलेली होती.त्यांतील शिंगाडी बकरें विशेषतः उत्तम होती. त्यांची लोंकर चित्रविचित्र रंगविलेली असल्याने त्या भागांतील देखावा मनोरम व मजेदार दिसत होता. साऱ्या प्रदर्शनांत यांपैकी प्रमुख जात केंट कौंटी मधील मोठी व लांब लोकरीची होय. येथे आलेल्या कालवडी व डुकरें आकाराने फारच मोठी होती. ती इतकी की, या त्यांच्या अवजड अंगामुळे त्या डुकरांना नीट उभे सुद्धा राहता येत नव्हते आणि 'पिक्विक् पेपर्स' मध्ये वर्णन केलेल्या लठ्ठ पोराप्रमाणे नेहमी निजलेली, अशी त्यांची स्थिति होती.