पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. त्यांचे मला येथें विशेष वाटले नाही. एकंदरीत पाहतां येथे आलेले घोडे विशेषतः मेहनतीच्या व शेतकामाच्याच उपयोगाचे होते. 'हंटर्स' किंवा शिकारीच्या कामाच्या घोड्यांची, तसेंच 'शेटलंड ' व 'पोलो पोनीज' ची संख्या पुष्कळशी होती असें नाही. तरी त्यांच्या अंगच्या गुणामुळे ती लोकांना फारच पसंत होती. त्यांचा अप्रतिम डौल प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून टाकीत होता. येथे एक गोष्ट माझ्या विशेष लक्षात आली, ती ही की, घोड्यांच्या शेपट्या कापून टाकलेल्या होत्या. हिंदुस्थानांत याचा रिवाज नाही. 'अवर डंब फ्रेंड्स लीग'-मुक्या मित्रांचा साहाय्यकारी संघ-या उपयुक्त संस्थेच्याच मुख्यत्वे प्रयत्नामुळे ही चाल अलीकडे, इंग्लडांत बंद होत चालली आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मुक्या जनावरांवर सक्ती व क्रूरपणा न व्हावा एतदर्थ ही संस्था अनेक प्रकारे झटत असते. प्राच्य देशांत बैलांना वशिंड असते. ते पाहण्याची आम्हांला नेहमींची संवय. त्यांचा इकडे अगदी अभाव. यामुळे इकडील गुरे पाहतांना चुकल्यासारखे वाटत होते. इकडील गुरे भारीच बोजड, हाही एक त्यांच्यामध्ये विशेष अवगुण आहे. येथील डेव्हनच्या विभागामध्ये हत्तीसारखी गुरें पाहण्यांत येत होती. इकडे अशी अजस्र गुरे असतात हे ज्यांना माहीत नाही, त्यांना इतकी भारी व मोठी गुरे इंग्लंडांत असतील, अशी कल्पना स्वप्नांत सुद्धा होणार नाही.