पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. र्शनाचीही एक शाखा होती. लोणी तयार करणे, मधमाशा पाळणे व इतर अशा प्रकारचे खेड्यांत चालणारे धंदे, यांचे रोज सामने होत, व त्यांची प्रत्यक्षतः कृति करून दाखविली जात असे. यांची शिक्षणाच्या दृष्टीने थोडी किंमत होती, असें नाही. शेतकीपासून पैदा होणारे निरनिराळ्या त-हेचे जिन्नस दाखविले जात होते. तेथें खेड्यापाड्यांतील शिक्षणपद्धतीचीही हेळसांड केली जात होती असे नाही. जंगलखातें, ज्याच्याकडे विलायतेमध्ये फार दिवसांपासून दुर्लक्ष झालेलें होतें, त्यालाही या कार्यक्रमामध्ये स्थळ मिळालेले होते. हा कार्यक्रम जणों सर्वव्यापी असा होता. प्रदर्शनांत आलेल्या सर्व वस्तूंचा तपशीलवार क्याटलाग विकत मिळत होता. हिंदुस्थानांत प्रदर्शनांत आलेल्या वस्तूंची यादी प्रदर्शन संपेपर्यंत सुद्धा तयार होण्याची मुष्कील. ___घोड्यांच्या विभागांत आलेले घोडे चांगले नांवाजण्यासारखे होते. आजकालचे युग शास्त्रीय प्रगतीचें. मोटार गाड्या व यांत्रिक शक्तीने चालणारी इतर प्रवहणे यांची त्वरेनें भरभराट होऊन, ती इतर वाहनें नामशेष करणार, असे दिसते. तरी पण या प्रदर्शनावरून अश्वयाने हार जातीलसें दिसले नाही. येथे आलेले ' शायर ' घोडे पाहून मला समाधान व आश्चर्य वाटले. त्यांतही त्यांच्यांतल्या वळू घोड्यांचे रूप, बांधा व मजबूती, चित्रासारखी होती. अव्वल प्रतीच्या उत्तमोत्तम जोड्या, चौकड्या, वगैरे मी लंडनमध्ये पूर्वीच पाहिल्या होत्या. यामुळे १८५