पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पण हे ब्रिस्टल येथील प्रदर्शन मला नेत्रांजनासारखे झाले. तेथील असंख्यात वस्तुसंग्रहाचे मी में निरीक्षण केले,त्यावरून या प्रदर्शनाचा सर्वसामान्य अत्युत्तमपणा माझ्या मनांत भरला आणि असे हे प्रदर्शन पाहण्यास सांपडले हे आपले भाग्य होय असे वाटले. घोडे, बैल व गाई यांच्यामधील जणों अव्वल प्रतीची निवडक जनावरें तेथें आलेली होती. शिवाय, सर्वांत अतिशय प्रमुख व थोर धंदा जो शेतकीचा, त्याच्या सुधारणेसाठी तयार केलेल्या व अगदी आजतागायत योजिलेल्या क्लुप्त्या, आणि अगदी ताज्या सुधारणांनी युक्त यंत्रे व अवजारे तेथे मांडलेली होती. इकडील शेतकीमध्ये जी विलक्षण सुधारणा झालेली आहे, ती अशा संस्था व प्रदर्शने यांच्या द्वारें मिळणारे उत्तेजन नसते तर खचित झाली नसती. या सुधारणारूपी परिणामावरूनच अशा संस्था व प्रदर्शने यांची आवश्यकता व महत्त्व उत्तम त-हेनें सिद्ध होते. अलीकडे हिंदुस्थानांत बरीच नवीन जागती उत्पन्न झाली आहे. तिच्यामुळे इतउत्तर तिकडे शेतकी व तत्समान इतर धंदे यांची सुधारणा व अभिवृद्धि यांविषयी प्रयत्न करण्याला अधिकाधिक उत्तेजन दिले जाईल, अशी उमेद वाटते. ___ या प्रदर्शनामध्ये प्रमुख व अव्वल प्रतीच्या पेक्षणीय वस्तूंमध्ये गाई, बैल, बकरी, मेंढरें व डुकरें, यांचे समूह हे होते. शिवाय, कोंबडी, बदके व खबुतरे यांचे प्रदर्शनही सुरेख होतें. बागाइताचे प्रदर्शन बरेच मोठेसें होतें व कुत्र्यांच्या प्रद