पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. करीत असतात. पण हिंदुस्थानांत ती प्रदर्शनाच्या पुरस्कांना करावी लागते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. हा 'रॉयल अग्रिकलचरल शो' फिरता असून तो दरसाल आळीपाळीने निरनिराळ्या शहरी भरतो. तो सुरू होऊन सत्तर वर्षे झाली. येवढ्या मुदतींत तो ब्रिस्टल येथे भरण्याची ही तिसरी पाळी आहे. प्रत्येक प्रसंगी या शहरी राज्यकर्ते हजर राहिल्याने त्याला शोभा आलेली होती. प्रदर्शनाची जागा उंचशा माळावर होती. त्याला 'डौन्स' ह्मणतात. तेथून शहर व आसपासचा प्रदेश, यांचा देखावा पुष्कळच विस्तीर्ण व रम्य दिसतो. जवळच अॅव्हन् नदीवर बांधलेला 'क्लिफ्टन् ' चा तारेचा झुलता पूल आहे. या उंचवट्यावरून एकीकडे सुसमृद्ध कुरणे व उंचसखल टेकड्या व दुसऱ्या बाजूला शहानशहांनी नुकतीच चालू केलेली ' अॅव्हन मौथ'ची नवीन गोदी, व पलीकडे दूरवर महासागराच्या सदाचंचल व प्रचंड लाटा दृष्टीस पडतात. शेकडो फूट खालीं नदीवर चालणाऱ्या आगबोटी 'लिलिपटियन' आकाराच्या,-भातुकलींतल्या सारख्या व डोंगराच्या खोऱ्यांतील बोगद्यांतून आंत बाहेर जात असलेल्या आगगाड्या, मुलांच्या कळीच्या खेळण्यासारख्या वाटत होत्या. पठार, टेकड्या व खोरी, यांच्यावर तृणलतावृक्षादिक उद्भिज संपत्तीची समृद्धि होती. हे सर्व पाहून मला आमच्या देशांतील नर्मदा व तुंगभद्रा नद्यांच्या प्रांतभागांतील, खडबडीत व भीषण, पण रम्य अशा देखाव्यांचे स्मरण झाले. ___ हे प्रदर्शन फारच भारी प्रमाणावर होते. तेथे आलेली गुरेंच तीन हजारांवर होती. परंतु येथील सारी व्यवस्था इतकी अप्र.. तिम होती की, गोंधळ किंवा गडबड, यांचा कोठे मागमूस सुद्धां दृष्टीस पडला नाही. सर्व व्यवस्था निवळ यंत्रासारखी, टापटिपीने व सुरळीत चालली होती. येथील बंदोबस्ताची जी पूर्णता व सफाई दिसून येत होती तिच्यावरून, प्राच्य व ब्रिटन यांच्यामधील पूर्ण व्यवस्थितपणा व बंदोबस्त, याविषयींच्या बुद्धिवैभवांतील विलक्षण फरकाची अद्वितीय साक्ष पटत होती. मी या गुरांच्या प्रदर्शनाला गेलों, तो, त्याच्या प्रेक्षणीयपणाविषयी थोडाबहुत साशंक होत्साताच, हे मी कबूल करितो. प्राच्य देशांतून आलेल्यांना ब्रिटिश गाई बैलांमध्ये, त्यांच्या नित्य पाहण्यात येणाऱ्या गुरांचा अप्रतिम आकार व रूप, यांच्या मानाने सुरेखपणा वाटण्याजोगें फारच थोडे असणार असे वाटते. शिवाय, डेव्हनशायरमध्ये साऱ्या इंग्लंडांत अत्युत्तम म्हणून नावाजलेल्यापैकी काही गाई व बैल मी पूर्वीच पाहिलेले होते. त्या गाई फार दूध देतात, हा त्यांचा गुण माझ्या लक्षांत होता. पण त्यांची ती अजस्र धुडे पाहून, मला तितके समाधान वाटले नाही. मात्र त्यांची निपज व अवलाद सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न व परिश्रम मला अर्थातच पसंत होते. १८३