पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग चौदावा. ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. .. मी ब्रिस्टलला गेलो तेव्हां तें ऐतिहासिक शहर ध्वजपताकांदिकांनी श्रृंगारलेलें व उत्सवप्रमोदयुक्त दिसत होतें. तेथील वार्षिक शेतकीचें प्रदर्शन पाहण्यासाठी बादशहा यावयाचे असल्याने त्यांच्या सन्मानार्थ हा समारंभ होता. या देशांत शेतकीसंबंधी दरसाल अवश्य घडून येणाऱ्या गोष्टींपैकी, हे प्रदर्शन अव्वल प्रतीचे असते. हे प्रदर्शन निवळ ग्रेट ब्रिटन पुरतेच असते, असे नाही. समुद्रपारच्या वसाहती व राज्यविभागही त्याच्यांत सामिल होतात. यामुळे त्याला साम्राज्यद्योतक बादशाही स्वरूप येते. ___ या प्रदर्शनांतील समुद्रपारच्या भागांत ज्या निरनिराळ्या देशांतून प्रेक्षणीय वस्तू पाठविण्यात आलेल्या होत्या त्यांत मलाया द्वीपकल्पांतील संरक्षित संस्थाने, आस्ट्रेलियांतील स्वराज्य उपभोगणारे व्हिक्टोरिया, सौथ आस्ट्रेलिया, वेस्ट आस्ट्रेलिया, व क्वीन्सल्यांड,हे भाग, तसेंच दक्षिण आफ्रिका, ब्रिस्टल शहर आणि तेथील राजाश्रित प्रदर्शन. व्होडेशिया, आणि क्यानडा यांचा समावेश होतो. बंगात्यांतील शेतकी खाते व 'वेस्ट इंडिया कमेटी' यांनीही काही वस्तू व नमूने पाठविले होते. तरी येथे हिंदुस्थानातर्फे योग्य निदर्शन झालेले नव्हते, हे पाहून माझी नाउभेदं झाली. पुढे तरी अशा प्रसंगी साधेल तोवर, ही उणीव भरून काढली जाणे अवश्य आहे. या जगत्प्रसिद्ध प्रदर्शनांत आपापल्यातर्फे चांगले निदर्शन व्हावे ह्मणून, इतर मोठमोठ्या राज्यविभागांतील स्थानिक सरकारांनी फारच अगत्य व उत्सुकता दाखविली होती; व पुष्कळ परिश्रम केले होते. या बाबतींत होणारा 'परिश्रम व खर्च यांचा उत्तम मोबदला मिळतो. कारण, त्या योगाने त्यांच्याकडे पैदा होणारे कच्चे पदार्थ व तयार माल यांची प्रसिद्धि होते, व त्याच्या खपासाठी नवे नवें गि-हाईक मिळते. या प्रदर्शनांतील वस्तूंची शिक्षणसंबंधांतही भारी किंमत आहे. ते पाहण्यास येणाऱ्या लोकांना, त्या त्या देशांत उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान होते व त्यांच्या मनांत तिकडे वसाहतीला जाण्याची प्रेरणा होण्याला साधन होतें. तिकडील सरकारांतून आपापल्या भागांतील हवा, पाणी, जमीन, पीक वगैरेसंबंधी तपशीलवार माहितीची लहान लहान छापील पुस्तकें वाटली जात होती आणि ह्मणून प्रदर्शनाचा हा भाग जरी लहानसा असला, तथापि तो स्वतःच प्रेक्षणीय व प्रतिष्ठित अशा स्वतंत्र प्रदर्शनाचे काम करीत होता. येथे सुरुवातीपासून अखेरीपर्यंत सर्व व्यवस्था, वस्तू पाठविणारेच १८०