पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. परिणाम, राष्ट्रीय चारित्र्याला हानिकर सुद्धा होतो. आमच्यामधील जाति, धर्म, पंथ, यांचे भेद एकजुटीने सामाजिक कार्य करण्याच्या आड येतात. त्यांचा परिणाम इंग्लंडांतही थोडाबहुत वाईट होतो, नाही असे नाही. तरी पण त्या लोकांची दृढ देशभक्ति व व्यवहारज्ञान, यांच्यामुळे तो अत्यल्पसा होतो. आमीही हिंदुस्थानवासी लोकांनी स्वत:च्या हिंदीत्वाची खरी जाणीव बाळगिली, तर धर्मसंबंधी भेदभाव आमच्याही प्रगतीला आड येणे बंद होईल. आमच्यांतील परोपकारबुद्धि व औदार्य, यांचे विवेकशून्य व संकुचित मार्ग पुष्कळ प्रसंगीं त्रासाला व कटकटीला कारण होतात. विशेषतः तीर्थयात्रेच्या ठिकाणी लोकांना निष्कारण भारी त्रास व अपमान सोसावा लागतो. ही स्थिति सुधारून, हा प्रकार बंद करण्याचे काम, सरकार व समाजधुरीण यांनी करावयाचे आहे. आमचा दानधर्म व परोपकार यांना इंग्लंडांतल्यासारख्या संस्था स्थापन करण्याचे वळण लागेल, व आमचे परोपकारविषयक प्रयत्न सुव्यवस्थित होऊन, ते भक्कम व खात्रीलायक पायावर उभारले जातील, तर आमच्या साऱ्या देशाला फारच हितावह व सर्वांनाच अतिशय फायद्याचे होईल.