पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. दसऱ्या एका प्रसंगी कर्नल व मिसेस रे यांनी मला कॉब्ह्याम येथील : कन्व्हलसंट होम ' मध्ये नेऊन, तें. नीटपणे फिरवून दाखविले. ही आमची सफर चांगली मजेदार झाली. या संस्थेची इमारत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर बांधलेली आहे.लंडन येथील इस्पितळांमधील औषधोपचारानंतर किंवा तेथे शस्त्रक्रिया करवून घेतल्यावर आजारी लोक येथे घेतले जातात.. त्यांना आपले शरीरस्वास्थ्य पूर्ववत् कसे संपादन करून घेता येतें तें आमाला येथेच नीटपणे दृष्टीस पडले. येथील व्यवस्था प्रत्येक बाबतींत सर्वोत्कृष्ट असून ही संस्था ज्या उद्देशाने स्थापन झालेली आहे, तो ती उत्तम रीतीने सफल करीत आहे. इच्या आवारांत कांहीं उत्तमोत्तम गाई व कोंबडीं पाहण्यांत आली. हे 'होम 'निवळ खाजगी देणग्यांवर चालविलेले आहे अशी माझी समजूत आहे आणि कर्नल रे यांचा या संस्थेशी संबंध जडल्यापासून तिच्यासाठी त्यांनी पुष्कळ उपयोगी व फायद्याची कामें केली आहेत. अशा नाना त-हेच्या परोपकारी संस्था व्यवस्थित रीतीने चाललेल्या पाहून, व इंग्लंडांतील समाजाने असल्या संस्थांच्या व्यवस्थेच्या बाबतीत बहुतेक पूर्णावस्था प्राप्त करून घेतलेली लक्षात आणून, मला भारी आश्चर्य वाटले. हिंदुस्थानांत. आमच्यामध्येही दानधर्म व परोपकार यांविषयींची बुद्धि उपजत आहे. पण आमचा परोपकार व औदार्य युक्तायुक्तविचारविरहित व सरसकट असल्याने, बरेच वेळां त्याचा. १७८