पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. व दुर्बळ लोकांसाठी वसतिगृहे स्थापन करणे, इत्यादि गोष्टी करण्याकडे आपल्या परोपकारबुद्धीचा ते अधिक उपयोग करीत असतात. अशा त-हेच्या बऱ्याचशा संस्था पाहण्याचा मान मला मिळाला. उदाहरणार्थ, लंडनमध्ये असतांना स्टेपने काझवेवरील 'डॉक्टर बर्नार्डोज होम्स् , ' ही संस्था मी पाहिली. ती साऱ्या दुनियेत सर्वांत मोठा असा अनाथबालकाश्रम असून, तेथे ६००० वर मुले आहेत. तिच्या शाखा साऱ्या देशभर पसरलेल्या आहेत व तेथील काम राष्ट्रीय स्वरूपाचे आहे. निराश्रित, पोरकी व आईबापांनी टाकलेली, अशा मुलांना आश्रय देण्यासाठी या संस्थेची द्वारें रात्रंदिवस उघडी असतात. त्या मुलांना शिक्षण देऊन तयार केल्यावर, त्यांना कारागीर लोकांकडे किंवा कारखान्यामध्ये काम शिकण्याला ठेवतात. अगर क्यानडा देशांत पाठवितात. तेथे त्यांचा स्वीकार करण्याला तिकडील शेतकरी व जमीनदार फार उत्सुक असतात. त्या मुलांपैकी शेकडा पंचाण्णव स्वत:च्या मालकीचे शेतकरी बनतात. यावरून तिकडे ती पहिल्या प्रतीची कामकरी निपजतात, असे सिद्ध होते. हिंदुस्थानांत आमच्याकडेही अनाथबालंकाश्रम आहेत. पण ते या वसतिगृहांच्या मानाने कांहींच नव्हेत. ही वसतिगृहे किती तरी व्यवस्थित व खरोखर समाजहितकारक अशी बिनमोल कामगिरी बजावणारी आहेत. १७७