पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मध्ये स्थापना होणार आहे, आणि जरूसलेम येथील भग्न मंदिर पुनः बांधले जाणार आहे, असे मानतात. परलोकवासी जनरल बूथ यांनी स्थापलेली 'साल्व्हेशन् आर्मी'मुक्तिफौज-हा आणखी एक धर्मपंथ होय. ख्रिस्ती धर्माचे मुख्या कार्य समाजबहिष्कृत लोकांच्या उद्धाराकरितांच आहे, ह्या नेहमी विसरले जात असलेल्या तत्त्वांचे या मुक्तिफौजेतील लोक. पुरस्कर्ते आहेत. यांतील प्रत्येक पंथ व्यवस्थित रीतीनें परोपकार करण्याच्या प्रयत्नाचे मुख्य स्थान आहे. गरीब व गरजू लोकांच्या पोटापाण्याची व वस्त्रप्रावरणाची व्यवस्था करणे, तरुण मंडळीला करमणूक करणाऱ्या व स्वयंशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करणे, परस्परहितवर्धिष्णु मंडळ्या व · पेनी बँक्स ' यांची स्थापना करून त्यांच्या द्वारे लोकांना काटकसरीने वागण्याला. उत्तजन देणे, इत्यादि नानादिशांनी या धार्मिक पंथाचे, प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानांतल्यापेक्षां इंग्लंडामध्ये परोपकारबुद्धि व दानधर्म, अधिक प्रमाणावर आढळून येतात. प्रार्थनामंदिरे बांधणे, किंवा धार्मिक संस्थांच्या खर्चाची कायम व्यवस्था करणें, येवढ्यांतच आपल्या परोपकारबुद्धीचे कार्यक्षेत्र मर्यादित न करतां त्याखेरीज ' आर्फनेजेस'-अनाथबालकाश्रम,–'कन्व्हलसंट होम्स'-आजारांतून नुकत्याच उठलेल्या रोग्यांच्या शुश्रूषेसाठी वसतिगृहे-,इस्पितळे, गरजू सभ्य स्त्रियांसाठी कामधंद्याची सोय करून देणे, अंध, पंगु, मुके, बहिरे, अशा अपंग