पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. 'धि वेस्लेयन् मेथोडिस्ट्स' हा पंथ जान वेस्ले यानें स्थापन केला. तो 'आक्सफर्ड ' येथे असतांना तेथील 'चर्च'चे धार्मिक बाबतींतील उदासीन वर्तन पाहून त्याला प्रेरणा झाली व त्याने तेथे शिकत असलेल्या काही 'अंडर-ग्राज्युएट ' मंडळीचा एक लहानसा संघ स्थापित केला. प्रार्थनेच्या पुस्तकाप्रमाणे अधिक काळजीने वागणे, त्यांत सांगितलेले उपवासादिक नेमधर्म जास्त नेमाने पाळणे, ' साक्रमेंट्स'-प्रभुभोजनच्या वेळी अवश्य व नियमाने हजर राहणे, व सारा वेळ विशेष व्यवस्थेनें व नियमितपणानें खर्च करणे,अशाप्रकारे वागण्याविषयी त्याने नियम केले. यावरून या पंथाला ' मेथोडिस्ट्स ' असें नांव पडले. सारे जग माझें 'पारिश' –धार्मिक हुकमतीचे क्षेत्रआहे." अशी 'वेस्ले'ची उक्ति सार्थ झालेली आहे, कारण, ' मेथोडिजम्' व त्याचे अवांतर भेद, यांचे अनुयायी, जगांतील दूरदूरच्या कोन्याकोपऱ्यांमध्येही आढळून येत आहेत. असाच दुसरा एक धर्मपंथ — बॅप्टिस्ट ' हा होय. अल्पवयी बालकांना - बाप्तिस्मा' देतात व त्यावेळी त्यांच्यावर पवित्र जलाचे नुसतें -मार्जन केले जाते. ते या पंथांतील लोकांना मान्य नाही. त्यांच्या मते,या ऐवजी ख्रिस्तीधर्म मानणाऱ्याला तो पक्का वयांत आल्यावर 'बाप्तिस्मा' द्यावा व त्यावेळी त्याला पूर्णपणे पाण्यात बुचकळणेच अधिक श्रेयस्कर आहे. त्याचप्रमाणे ' ज्यू ' किंवा यहूदी पंथाचे लोक त्यांच्या धर्मातील 'मसीहा'ची-प्रेषिताच्या अवताराची-वाट पाहत असून आपल्या जातीच्या लोकांची पुनरपि पालेस्टाईन १७५