पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. राष्ट्रीय 'चर्च'चा" हक्क, अबाधित कायम राखला आहे. ( कलम ३४ ). राजाच्या हाती "या राज्यांतील सर्व सामाजिक किंवा धार्मिक इस्टेटींचा ताबा, व त्यांची व्यवस्था लावण्याची सत्ता आहे," हेही तत्त्व त्यांनी स्थापित केले आहे. तसेच "रोमचा बिशप-'पोप'-याची इंग्लंडच्या राज्यामध्ये कोणतीही हुकुमत," नाही असेंही त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. (कलम ३७ ). निस्संशय 'इंग्लिश चर्च'ने राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीत फारच मोठा कार्यभाग केला आहे. 'प्रेस्बिटेरियन् ' पंथवाल्यांना धर्मोपदेशक व उपाध्ये यांची नेमणूक व अधिकार दैवी असल्याचे कबूल आहे. पण खरी 'अपालिक् ' प्रेषितांची परंपरा 'प्रेस्बिटर ' मंडळामध्येच असून, धर्मगुरू नेमण्याचा अधिकार 'बिशप' लोकांनी केवळ आपल्याच हाती असल्याचे ठरविले आहे, तें अयोग्य व अधिकाराबाहेरचे आहे, असे ते मानतात. ' कांग्रिगेशन लिस्ट्स ' यांची स्थिती व मत याच्या अगदी उलट आहे. खिस्तीधर्माच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक संवाला आपापल्या पुरतें पूर्ण व्यवस्थास्वातंत्र्य आहे व असले पाहिजे, असें त्यांचे झणणे आहे. 'क्रीड्स'-धर्मसूत्रे व धर्मसंबंधी कलमबंद्या-अनावश्यक असून, खिश्चियन चर्च'चा अधिकार, केवळ धार्मिक संबंधापुती आहे, सबब त्याला ऐहिक किंवा सामाजिक सत्तेचा संपर्क लावून भ्रष्टपणा येऊ देणे ठीक नाही, असेही ते ह्मणतात. १७४