पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी मदत व दानधर्म. असते. ब्रिटिश लोकांचा दुसरा एक उपजत गुण त्यांच्या व्यावहारिक नीतीमध्ये आढळून येतो. धर्माच्या योगानें खरोखर त्यांच्या साऱ्याच चारित्र्याला उच्चपणा येतो. आणि सर्वसाधारणपणे त्यांची प्रत्येक क्रिया धर्मतत्त्वांनी अनुशासित (नियमित ) झालेली असते. त्यांना लहानपणी रविवारच्या शाळेत मिळालेल्या शिक्षणाचा व साऱ्या शिक्षणक्रमामध्ये त्यांना जे धर्मविषयक शिक्षण मिळते, त्याचा, कदाचित् हा परिणाम असेल. इंग्लंडामध्ये पुष्कळसे धर्मपंथ आहेत. विचार व वर्तन यांचे स्वातंत्र्य सर्वमान्य असलेल्या या देशामध्ये ही गोष्ट काही आश्चर्यकारक नाही. 'चर्च ऑफ इंग्लंड' या पंथाचे सर्वांहून अधिक अनुयायी असून त्या 'चर्च'चें असें ह्मणणे आहे की, त्याच्यांतील 'बिशप, प्रीस्ट, व डीकन' यांनी घटित अशी त्रिविध धर्मोपाध्यायांची तन्हा व परंपरा ही 'अपॉसल्स'प्रेषितांच्या वेळच्या 'चर्च'च्या नियमाला अनुसरून आहे. इतकेच नव्हे, तर 'बिशप' लोकांना त्यांचा धार्मिक अधिकार, खुद्द 'अपॉसल्स'पासून सारखा परंपरेनें प्राप्त झालेला आहे, व हल्ली होतो आहे. त्याच्या शेकडो वर्षांच्या इतिहासांत त्या 'चर्च'ने 'क्याथलिक चर्च'च्या पोटामध्ये राष्ट्रीय ‘चर्च' कायम ठेवण्याचे ध्येय राखले आहे. तसेंच 'केवळ मानवी अधिकारावर चालू असलेले 'चर्च' संबंधी विधि व संस्कार रद्द करण्याचा, किंवा त्यांच्यांत फेरफार करण्याचा प्रत्येक विवक्षित किंवा १७३