पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. कारतात, ती केवळ कोणाला साहाय्य करण्यास्तव ह्मणून केली जात नसून, ती करणाराला पुण्य लागते व परलोकी फायदा होतो, या कल्पनेमुळेच होय. हिंदुस्थानामध्ये लोकांची दृष्टी व साऱ्या जीवनक्रमाचे अनुसंधान नेहमी पारलौकिक विचाराला धरून असते. हिंदूधर्माच्या मुख्य तत्त्वाचा पाया वैय्यक्तिक जीवात्म्याला मुक्ति मिळविण्याच्या कल्पनेवर रचलेला आहे. पण वरील तत्त्वाखेरीज इंग्रज लोकांच्या ख्रिस्ती धमांत भूतदया विशेष असून तो खरोखर उपयुक्त अशा परोपकाराच्या तत्त्वांनी ओतप्रोत भरलेला आहे. इकडील प्रार्थनामंदिरें हिंदुस्थानांतील देवालयांइतकी सुगम नसतात. तेथे कोणी तितके वरचेवर जातही नाहीत. इंग्रज लोक मंदिरांत प्रार्थनेला कदाचित् आठवड्यांतून फक्त एक दिवसच जात असतील व बाह्यतः रविवारच्या पोषाखाबरोबरच त्यांनी आपला धर्मही इतर दिवशी खुंटीवर ठेवल्यासारखा दिसत असेल. तरी नैतिक आचरणासंबंधींचे निबंध ते फार कडक रीतीने पाळतात. ब्रिटिश लोकांमध्ये 'सेन्स आफ आनर'-सभ्यपणाची कल्पना व विचार–पाहिल्या दर्जाचा असतो. हिंदुस्थानांत सुजनत्वाच्या कल्पनांची वाढ जरी वरील इतकी झाली नसली, तथापि हिंदी लोकांत धर्म व औदार्य यांचे तत्त्व, सर्वातिशायी असते. यामुळे हिंदी लोक आपल्या जातीचा कोणीही उपाशी सोडून कधीही जेवणार नाहीत. अडचणीत असलेल्या अतिथीला त्यांचे दार नेहमी उघडे १७२